E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार
Samruddhi Dhayagude
12 May 2025
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची गाथा
भारतीय लष्कराकडून पुरावे सादर
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला असून मुरिदके, भावलपूरसह नऊ ठिकाणी हल्ले करुन १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती लष्करी कारवाई महासंचालक, लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी रविवारी दिली. पाकिस्तानच्या दहशतवाद नष्ट करणे हेच ऑपरेशन सिंदूरचे ध्येय असल्याचेही ते म्हणाले. कारवाईत ३५ ते ४० पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला असून त्यामध्ये अनेक अधिकार्यांचाही समावेश आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईची माहिती देण्यासाठी तीनही सैन्य दलांनी काल पत्रकार परिषद घेतली.
लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, लष्कराने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. दहशतवाद्यांच्या ठिकाणांना अचूक लक्ष्य करण्यात आले आहे.
पाकिस्तानी अधिकारी मारले. पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी २६ निष्पाप पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. दहशतवादाचे गुन्हेगार आणि त्या मागे असणार्यांना शिक्षा करणे आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे कारवाईचे प्रमुख उद्दिष्ट होते.
लष्कराने ७ मे रोजी सकाळी नऊ दहशतवादी तळावर कारवाई सुरू केली. त्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यामध्ये कुख्यात दहशतवादी युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासर अहमद याचा समावेश आहे. भारतीय विमानाचे अपहरण करण्यात आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यात त्यांचा सहभाग होता. ६-७ मे रोजी झालेल्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही मारले गेले.
हवाई दलाकडून दहशतवादी तळ नष्ट
एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले, पहलगाममधील निंदनीय घटनेनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. ठरलेल्या नऊ लक्ष्यांपैकी, भारतीय हवाई दलाला बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे नष्ट करण्याची कामगिरी देण्यात आली होती. ही दोन्ही ठिकाणे पाकिस्तानी हद्दीत आहेत. ठरल्याप्रमाणे हवाई दलाने त्याची कामगिरी पार पाडली आणि दहशतवादी तळ नष्ट केले.
घाबरलेल्या पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव
नऊ दहशतवादी तळ उडविले
तीन कुख्यात दहशतवादी मारले
बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे नष्ट
जैश ए महमद आणि लष्कर ए तैयबाचे कंबरडे मोडले
दहशतवाद्यांची पायाभूत सुविधा नष्ट करणे कारवाईचे प्रमुख उद्दिष्ट
अनेक पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
सर्व भारतीय वैमानिक सुरक्षित
नौदलाचे बारकाईने लक्ष ठेवले
Related
Articles
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
मुंबईतील रिक्षा चालक महिन्याला ५-८ लाख कमवतो
05 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
मुंबईतील रिक्षा चालक महिन्याला ५-८ लाख कमवतो
05 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
मुंबईतील रिक्षा चालक महिन्याला ५-८ लाख कमवतो
05 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
मुंबईतील रिक्षा चालक महिन्याला ५-८ लाख कमवतो
05 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर